आर्थिक

श्री गणेश सहकारी बँक निवडणूक : शंकर जगताप यांचे लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या पावलावर पाऊल

पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण संचालक मंडळाची बिनविरोध निवड

पिंपरी | प्रतिनिधी

श्री गणेश सहकारी बँक ही लोकसेवेचा वसा घेतलेली बँक असून, बँकेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांना याचा मोठा फायदा झाला आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे बँकेचे संस्थापक – संचालक होते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने या बँकेच्या माध्यमातून अनेकांचे व्यवसाय उभे राहिले आहेत. आपल्या ग्राहकांना वेगवान सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असून, आगामी काळात बँकेचा व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशा भावना श्री गणेश सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक शंकर जगताप यांनी केले.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास करता येवू शकतो, हे समजून लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपळे गुरव येथे सन १९९८ साली बँकेची स्थापना केली. बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तत्पर सेवा, बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आकर्षक कर्ज योजना, ठेव योजना यामुळे बँकेकडे ग्राहकांचा ओघ सातत्याने वाढत आहे.
श्री गणेश सहकारी बँक मर्यादित या बँकेची पंचवार्षिक निवडणुकीचा सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये सर्व १७ उमेदवार बिनविरोध निवडून (सन २०२३-२०२८) आले. या निवडलेल्या संचालक मंडळातून बँकेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकारी निवडले जाणार आहेत. शंकर जगताप यांनी लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या पावलावर पाऊल टाकत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवली. या बद्दल खातेदार, सभासदांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून नागनाथ केंजेरी यांनी कामकाज पाहिले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे…
संचालक सदस्य – सर्वसाधारण गट : शंकर पांडुरंग जगताप, संजय गणपत जगताप, दत्तात्रय गोविंद चौघुले, शशिकांत गणपत कदम, उद्धव मुरार पटेल, अंकुश रामचंद्र जवळकर, संतोष सखाराम देवकर, शिवलिंग बसवंतप्पा किंणगे, मधुकर सोपान रणपिसे, सुरेश तात्याबा शिंदे, शहाजी भगवानराव पाटील, प्रमोद नाना ठाकर महिला गट – राजश्री बिभीषण जाधव, शैला जनार्दन जगताप, राखीव गट (अ. जा. अ. ज) – अभय केशव नरडवेकर, राखीव गट (इ. मा. व.) – राजेंद्र शंकर राजापुरे, राखीव गट (भ. जा., वि. जा. वि. मा. प्र) – सुरेश शंकर तावरे.
बँकेला बिनविरोध निवडणुकीची परंपरा
बँकेची मागील निवडणूक सन २०१५ ते २०२० या कालावधीसाठी घेण्यात आली होती. या कालावधीमध्ये बँकेचे अध्यक्ष संजय जगताप होते. सन २०२० साली असलेल्या कोरोना काळामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सन १९९८ या साली बँकेची स्थापना झाली आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पुढाकार घेताना बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रथेला सुरुवात केली होती. आज मात्र, आमदार जगताप हयात नसताना त्यांचे बंधू शंकर जगताप यांनीदेखील हीच परंपरा कायम राखताना ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली.


लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश सहकारी बँक आजही आपली नियमित प्रगती करत आहे. यामुळे बँकेवर तिच्या ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर व बँकेवर ज्या पद्धतीने सभासदांनी व खातेदारांनी विश्वास ठेवला, तोच विश्वास आणि बँकेची नियमित प्रगती साधण्यासाठी आम्ही सर्व नवनिर्वाचित संचालक कटिबद्ध आहोत.

  • शंकर जगताप, नवनिर्वाचित संचालक. श्री गणेश सहकारी बँक मर्या., पिंपळे गुरव.

मा.शंकर पांडुरंग जगताप
शहराध्यक्ष : भारतीय जनता पार्टी
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!