Uncategorized

रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पाठपुरावा करणार!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’चा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेकदा बैठक झाली. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. पण, हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार होतील. त्यामुळे ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’ करण्यासाठी आम्ही पुन्हा संरक्षण विभाग आणि प्रधानमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत आणि हा प्रश्न सोडवणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त भोसरी येथील गावजत्रा मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी फडणवीस बोलत होते.

आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात ‘रेड झोन’ बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. फडणवीस यांच्या सहकार्यामुळे शहरातील शास्तीकर, उपयोगकर्ता शुक्ल, कचरा प्रक्रिया प्रकल्प, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, समाविष्ट गावांचा विकास, आंद्रा, भामा आसखेड पाणी प्रकल्प आदी ‘भोसरी व्हीजन-२०२०’मधील सर्व महत्वपूर्ण विषय मार्गी लागले. मोदी सरकार धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते. हा प्रश्न तुम्हीच सोडवू शकता त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची ‘रेड झोन’ची मुक्तता करावी, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले.

दरम्यान, २०१४ मध्ये राज्यात भाजपा प्रणित सरकार स्थापन झाल्यापासून भोसरीतील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या-ज्या वेळी जाहीर सभा केल्या. आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न आणि मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. त्या सभांमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची त्यांनी पूर्तता केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा याच मैदानावर फडणवीस यांनी ‘रेडझोन’बाबत पिंपरी-चिंचवडकरांना आश्वासित केले आहे. त्यामुळे रेडझोनमधील मिळकतधारक, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक अशा २ लाख पिंपरी-चिंचवडकरांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे २ लाख मिळकतधारक, लघु व मध्यम उद्योजक यांना दिलासा देण्यासाठी ‘रेड झोन’ हद्द कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार महेश लांडगे यांनी ‘रेड झोन मुक्त पिंपरी-चिंचवड’ची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे. ‘रेड झोन’चा तिढा सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी संरक्षण विभाग आणि मोदी सरकार निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेणार आहे.

  • शिवाजीराव आढळराव पाटील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!